Panjab dakh ; राज्यात आता मुसळधार पावसाला सुरुवात होनार…

Panjab dakh ; राज्यात आता मुसळधार पावसाला सुरुवात होनार…

पंजाब डख यांच्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात आजपासून काही भागात पावसाला सुरुवात होईल.५ ते ७ ऑगस्ट काही ठिकाणी पाऊस पडेल, हा पाऊस सर्वत्र सारखा नसेल. शेतकऱ्यांनी पुढील दोन ते तीन दिवसांत शेतीची कामे पूर्ण करून घ्यावीत, असा सल्ला त्यांनी दिला आहे, कारण त्यानंतर पाऊस जोर धरनार आहे.

 

Panjab dakh ; या तारखेपासून पाऊस वाढनार..

 

८ ते १८ ऑगस्ट या काळात राज्यात पावसाचे प्रमाण वाढनार आसून ८ ते १८ ऑगस्ट दरम्यान, दररोज महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस पडेल. यामध्ये यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, बुलढाणा, जालना, संभाजीनगर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच राज्यातील सर्वच भागात ८-१८ दरम्यान चांगला पाऊस होनार आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून पाऊस येत असल्यामुळे त्या भागात जास्त पाऊस होईल अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.

 

Panjab dakh ; १४-१८ अतीमुसळधार पाऊस

 

त्यानंतर, १४ ते १८ ऑगस्ट या काळात पुन्हा एकदा मोठा आणि दमदार पाऊस परत येण्याची शक्यता आहे. हा पाऊस इतका जोरदार असू शकतो की काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.

 

Leave a Comment